पाठांतर स्पर्धा उपक्रमासाठी स्वयंसेवक पाहिजे आहेत

पाठांतर स्पर्धा
पाठांतर स्पर्धा

दरवर्षी प्रमाणे या वर्षी श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठान पाठांतर स्पर्धा घेत आहे. लहान मुलांवरती उत्तम संस्कार व्हावेत, चांगला व शास्वत विचार लहानपणीच मिळावा. आणि त्यांचा दृष्टिकोन लहानपणापासूनच दिव्य व भव्य व्हावा या अपेक्षेने लहान मुलांवरती उत्तम संस्कार घडावेत, असे श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठानचे ध्येय आहे. प्रतिष्ठानच्या कार्याचा तो एक अविभाज्य भाग आहे. त्यासाठी  प्रतिष्ठानचे कार्य वाढत असून कार्या प्रमाणे शाळाही वाढत आहेत.

या कार्यात मदत करू इच्छिणारे किंवा सहभागी होऊ इच्छिणारे स्वयंसेवक पाहिजे आहेत.

या कार्याअंतर्गत आठवड्यातून एकतास लहान मुलांना शाळेत जाऊन शिकवायचे आहे. तरी भाग घेऊ इच्छिणाऱ्यांनी संपर्क साधावा.

वाट्सअँप:  

ऍड. श्रीकांत पाटील ९३७१०२०६३२, सौ. गौरी देशपांडे ९८२२५७४०८६