प्रतिष्ठानचे कार्यक्रम

प्रतिष्ठानचे कार्यक्रम
ह. भ. प. सतिश महाराज काळजे पुणे, आपले बारदार कीर्तन करतांना, दिनांक २८ फेब्रुवारी २०१८    

श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठान तर्फे सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून समाज प्रबोधनासाठी विविध सांस्कृतिक आणि आध्यात्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात.

औंध गावाचा स्वामी समर्थ पालखी सोहळा व त्यानिमित आयोजित केलेले विविध कार्यक्रम प्रत्येक स्वामी भक्तांना मनःस्वास्थ देणारे आणि आनंददायी आहेत. ज्या प्रमाणे साधकाच्या जीवनामध्ये नाव विधा भक्तीचे महत्व मोलाचे आहे. त्यातली पहिली पायरी श्रवण भक्तीची आहे. आपण त्याचेच साधक आहोत. आणि त्याच साठी सात दिवसाच्या सोहळ्याचे आयोजन करतो. स्वामी भक्तांना उन्नत होण्यासाठी या कार्यक्रमाचे नियोजन असते.

"जे जे आपणाशी ठावे ते ते दुसऱ्यांशी सांगावे" या संतांच्या वचनाप्रमाणे त्यात वेदपठण, दिंडी,  वारकरी कीर्तन, भजन, प्रवचन, नारदीय कीर्तन, कीर्तन जुगलबंदी, भक्ती संगीत, नृत्य, परिसंवाद, अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.  

कार्यक्रम - २०१८: प्रवचन परिसंवाद, कीर्तन, संगीत, नृत्य व पुरस्कार सोहळा

कार्यक्रम आणि वक्ते

दिंडी- स्वामी भक्त परिवार 

वेदपठण- पौरोहित्य वर्ग, औंध

कीर्तन- ह. भ. प. सतिश महाराज काळजे, पुणे

आरोग्य- सर्व रोगांवरील उपचारसंबंधी माहिती, श्री शाम जोशी 

भजन- स्वरगंधा, शालेजा दामले

संतवाणी- श्री संतोष देशमुख, कै. डॉ. सुहासिनीताई कोरटकर यांचे शिष्य

भजन- संवादिनी ग्रुप, अपर्णा राहुरकर, औंध 

गीतरामायण- स्वरसंपदा ग्रुप, सौ. संपदा गोखले

सामुहिक श्री-सुक्त हवन-  मोफत कार्यक्रम. सर्वाना निमंत्रण 

कार्यशाळा: कुंडलिनी व ध्यान- डॉ. राधिका नंदन 

बक्षीस समारंभ (पाठांतर स्पर्धा)- अशुतोष कुलकर्णी (अभिनेता लेक माझी लाडकी टीव्ही सिरीयल), ऍड. दिलीप शेलार हस्ते

भजन (स्वामी वंदना)- स्नेहबंध ग्रुप, सौ. शुभांगी कुलकर्णी आणि सहकारी, औंध

नृत्य संध्या- सौ. स्वरश्री सुमंत

वैद्यकीय तपासणी- सह्याद्री हॉस्पिटल पुणे 

सुगम संगीत, भक्तिरंग स्वरारोही- सौ. आरोही किंबहुणे, अजित किंबहुणे 

परिसंवाद-  सहभाग: डॉ. अजित कुलकर्णी, विद्या वाचस्पती डॉ. सौ. आरती दातार, श्री भावार्थ देखणे, श्री मिलिंद काळे- अध्यक्ष कॉसमॉस बँक पुणे

नृत्य - सौ. ईशा काथवटे व सौ. मिथिला भिडे 

पुरस्कार सोहळा-
"श्री स्वामी समर्थ औंध" पुरस्कार ज्येष्ठ ऍड भास्करराव आव्हाढ 
हस्ते प्रा. डॉ. नितीन कारमाळकर, कुलगुरु सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे 
निवृत्त न्यायमुर्ती पी. बी. सावंत सर्वोच्च न्यायालय, दिल्ली 
प्रमुख उपस्थिती- मा. श्री शिवाजीराव कचरे (धर्मदाय सहआयुक्त पुणे विभाग, पुणे)  
श्री नवनाथ साहेब जगताप  (सहायक धर्मदाय आयुक्त, पुणे विभाग पुणे)
ज्येष्ठ ऍड. मनोज वाडेकर  

पालखी आगमन-  विठ्ठल मंदिर औंध 

मिरवणूक-  मार्ग  विठ्ठल मंदिर- भैरवनाथ मंदिर- मारुती मंदिर- शिवाजी पुतळा- मंगेश सोसायटी 

आरती, दर्शन व महाप्रसाद- मंगेश सोसायटी औंध

उत्सावातील विविध कार्यक्रमाचे फोटो